Maharashtra Board 10th Result अखेर प्रतिक्षा संपली, आज लागणार दहावीचा निकाल
नुकताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जातंय. मेच्या चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मेच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. आता विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. मेच्या चौथ्या आठवड्यात निकाल लागणार आहे. हेच नाही तर निकालाची तारीखही पुढे आलीये. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल हा लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल लागणार आहे.
राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आता निकालाची तारीख जाहीर करण्यात आलीये. दहावीच्या निकालाचे जवळपास सर्वच काम पूर्ण झाल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय. दहावीचे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १०वीचा निकाल कसा तपासायचा?
- महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.
- महाराष्ट्र बोर्डाचा निकाल २०२४ लिंकवर क्लिक करा.
- रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा व सबमिट वर क्लिक करा.
- तुम्ही आता महाराष्ट्र बोर्डाचे १०वीचे निकाल तपासू शकता.
- आपण निकाल तपासू शकता आणि डाउनलोड देखील करू शकता.
MSBHSC १०th Std Results Declared: MSBHSC १०वी इयत्ता निकाल लवकरच जाहीर होणार : दहावीचा निकाल राज्य मंडळाकडून उद्या जाहीर केला जाणार आहे. SSC चा निकाल MKCL च्या वेबसाईटवर उपलब्ध असेल, म्हणजे https://sscresult.mkcl.org. एचएससी विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआउट करिता एक वेळ अवश्य भेट द्या कृपया निकालाच्या तारखेशी संबंधित SSC बोर्डाकडून अधिकृत प्रेस रिलीज होईपर्यंत SSC निकालाच्या कोणत्याही तारखेवर लक्ष देऊ नका.
👇🏻 दहावी बोर्डाचा निकाल २०२४ या वेबसाईटवर पाहता येणार.
https://mahresult.nic.in
https://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
SSC MSBSHSE Examination (Class X) Results 2024 | |
---|---|
परीक्षा | 1 ते 26 मार्च 2024 |
निकाल दिनांक | 27 मे 2024 |
Link 1 |
Link 1 Link 2 Link 3 |
Link 2 |
Link 4 Link 5 Link 6 |