brand-logo

तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही चेक करता येईल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत । HSC Result 2024

 तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही चेक करता येईल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत  HSC Result 2024



राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च- एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (मंगळवार, दिनांक 21 मे) जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्याचा निकाल हा 93.37 टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे, तर विभागांमध्ये पुन्हा एकदा कोकण विभाग अव्वल ठरला आहे. 

शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर दुपारी 1 नंतर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने चेक करता येणार आहे. परंतू ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय नाही अशा विद्यार्थ्यांनाही त्यांचा निकाल ऑफलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ( Maharashtra Board 12th Result Declared)


Check HSC Result 2023 via SMS on Mobile) ज्यांच्याकडे इंटरनेट नाही ते विद्यार्थी एसएमएसच्या माध्यमातून त्यांचा निकाल चेक करु शकतात. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

- तुमच्या मोबाईलमधून एक एसएमएस पाठवावा लागणार आहे.

- त्याच्या सुरुवातीला कॅपिटलमध्ये MHHS असे टाईप करुन त्यापुढे रोल नंबर टाइप करावा लागेल.

- हा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

- त्यानंतर काही क्षणातच तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे.

जर इंटरनेट असेल तर खालीलपद्धतीने चेक करा तुमचा निकाल -



1) www.mahresult.nic.in


२) www.hscresult.mkcl.org


3) http://hsc.mahresults.org.in